फुलचंद भगत
वाशिम:-
ओबीसी समाजास घरकुल प्राप्त व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मोदी आवास योजना महाराष्ट्र राज्यात जाहीर केली. प्रधानमंत्री आवास योजनेत सर्व समाजांचा समावेश असल्याकारणाने आणि शबरी , रमाई आवास योजना या योजना आदिवासी समाज व दलित बांधवांसाठी उपलब्ध असल्याने ओबीसी व व्हीजेएनटी समाज बांधव ज्यांना देखील मोठ्या प्रमाणात घरकुल आवश्यकता होती त्यांना त्यांच्या आवश्यक तेवढ्या प्रमाणात यादीत घरकुल यादीत वर्णी लागत नव्हती,घरकुलाचा लाभ मिळत नव्हता. ही समस्या लक्षात घेता राज्य शासनाने मोदी आवास योजना 2023 मध्ये अंमलात आणली. पहिल्याच वर्षी वाशिम जिल्ह्यात दहा हजाराच्या सुमारास टार्गेट प्राप्त झाले आणि जिल्ह्यात दहा हजार घरकुल प्राप्त झाले. परंतु मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ओबीसी व्हीजे एनटी बांधवांसाठी घरकुलांची आवश्यकता असल्याने या बांधवांसाठी मंजूर करावयाची व वाशिम जिल्ह्याकरिता अधीक टारगेट वाढविण्याचे आवश्यकता ओळखून ॲड.ज्ञायक पाटणी यांनी संबंधित मंत्री अतुल सावे यांना पत्र लिहून याविषयी पंचवीस हजार घरकुल वाशिम जिल्ह्यासाठी मंजूर करून घ्यावेत तातडीने आचारसंहिता लागण्यापूर्वी अशी विनंती केली.

♦️वाशिम जिल्ह्यात पंचवीस हजार घरकुल टारगेट प्राप्त झाल्यास मतदारसंघात जवळपास 8000 हजार घरकुल ओबीसी, व्हीजेएनटी समाजास प्राप्त होतील योजनेअंतर्गत जिल्ह्यात शासनातर्फे मतदार संघ निहाय नव्हे तर जिल्हा निहाय टारगेट जाहीर केले जाते त्यामुळे मतदारसंघाला जास्त घरकुल प्राप्त करून घ्यायचे असल्यास जिल्ह्याचे टार्गेट वाढवून आणणे गरजेचे आहे. हे ओळखून त्यांनी वरील मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आदरणीय मंत्री अतुल सावे व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करू असे आश्वासन त्यांना दिले आहे. मोदी आवास योजनेमध्ये एक लाख वीस हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यात दिले जात असून त्यांचा प्रयत्न सफल झाला आहे. मतदारसंघातील ओबीसी, व्हीजेएनटी समाज बांधवांना 8000 घरकुल साठी थेट 100 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये हक्काच्या घराच्या निर्मितीसाठी प्राप्त होतील.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206