section and everything up until
* * @package Newsup */?> अंजनखेड जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात | Ntv News Marathi

दुचाकीची समोरासमोर धडक; १ ठार, १ गंभीर जखमी

माहूर ते सारखणी या राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड नजीक दि.४ ऑक्टों. रोजी दु.४.३० वा.चे सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

त्यात माहुर शहरातील गोविंद गणपत शेवाळे वय ४५ वर्षे हा जागीच ठार झाला, तर पिंटू माणिक आत्राम वय २५ रा अंबाडी तालुका किनवट हा जबर जखमी झाला आहे. शुक्रवार दि. ४ ऑक्टो. रोजी पिंटू मानिक आत्राम वय २५ रा. अंबाडी ता. किनवट हा वाई बाजार येथे आपल्या सासरवाडी वाई बाजार वरून सारखणीकडे जात होता. त्याचवेळी गोवींद गणपत शेवाळे हा सारखणी वरून माहूरकडे येत होता त्या वेळी हा अपघात झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटना बघताच दोघांना वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता येथे गोविंद शेवाळे यास डॉ अश्विनी जाधव यांनी मृत घोषित केले तर पिंटू आत्राम याची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यास पुढील उपचारासाठी किनवट येथे पाठविले आहे. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. १५/२०२४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात,
आली असून स. पो.नि. रमेश जाधवर हे पुढील तपास करीत आहेत. गोविंद शेवाळे हा माहूर येथील रि हवासी असून मितभाशी असल्याने त्याचे अपघाती निधनामुळे माहूर शहरात शोककळा पसरली आहे त्याचे पश्चात आई भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे

प्रतिनिधि सचिन जाधव NTV news मराठी नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *