( महिन्याभरात 3 हजारावर युवक व महिलांचे प्रवेश ; पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न ; काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरुच )
उमरखेड :
गत दहा वर्षापूर्वी गमावलेला उमरखेड विधानसभेचा बालेकिल्ला परत ताब्यात घेवुत. मागील महिन्याभरात कॉग्रेसमध्ये 3 हजाराच्या वर युवक व महिलांनी प्रवेश घेतला. जनतेने दाखविलेल्या विश्वास व प्रेमावर काँग्रेसचा आमदार निवडून आणू , असा ठाम विश्वास हिंगोली लोकसभा समन्वयक तातु देशमुख यांनी व्यक्त केला. स्थानिक राजस्थानी भवनात रविवारी 6 ऑक्टोंबर रोजी, 1 वाजता झालेल्या, पक्ष प्रवेक्षाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
पार पडलेल्या पक्षप्रवेश व कार्यकर्ते मेळाव्याला संबोधित करताना तातू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यावर घणाघात केला. सत्ताधारी पक्षाकडून सध्या सत्तेचा दुरुपयोग वाढला असून, बेरोजगारी व विकासाच्या नावावर होत असलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची दुरावस्ता यामुळे जनता त्राहीमाम करीत आहे. मागील काळात काँग्रेस पासून दूर गेलेली जनता आता पुन्हा काँग्रेसकडे वळली असून, विधानसभेच वार आता बदललं असल्याचे संकेत दिले. मागील महिन्याभराच्या कालावधीत कॉग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाली असून, 3 हजारापेक्षा जास्त युवक व महिलांनी आतापर्यंत प्रवेश घेतला असल्याची कबुली , प्रदेश सरचिटणीस तथा हिंगोली लोकसभा समन्वयक तातू देशमुख यांनी यावेळी दिली.
पक्षप्रवेश सोहळ्यात महागाव तालुक्यातील तीवरंग येथील उपसरपंच तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष गुणवंत राठोड यांनी आपल्या 500 वर महिला व सहकाऱ्यांसह, काँग्रेस नेते तातु देशमुख, राम देवसरकर, गोपाल अग्रवाल व साहेबराव कांबळे यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश घेतला. यावेळी व्यक्त होताना त्यांनी , उमरखेड व महागाव येथील सत्ताधारी भाजप नेत्यांनी, खोटे गुन्हे दाखल करायला लावून, अतोनात त्रास दिल्याचा अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. यावेळी सर्व उपस्थितांच्यांही डोळ्यात ही अश्रू दाटले होते.
यावेळी पक्षप्रवेश व कार्यकर्ते मेळाव्याला काँग्रेसचे नेते तातू देशमुख, राम देवसरकर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, गोपाल अग्रवाल, काँग्रेसकडून इच्छुक साहेबराव कांबळे, शिवाजीराव देशमुख , महेंद्र कावळे, शैलेश कोपरकर साहेबराव कांबळे, स्वप्निल नाईक, विवेक मुडे ,वसंतराव भुरके, दादाराव गव्हाळे, बाळासाहेब चंद्रे , शिवाजी वैद्य, प्रेमराव वानखेडे, रंजना लांबटिळे, कविता पोपुलवाड, जयवंत दीपला जाधव, परमेश्वर आडे, सुनील तायडे, गोपाल जाधव, संजय चोरमले, शेख अली, वसिफ पठाण, शेख तालीब , सोनू खतीब, शेख नाजीम व इच्छुक उमेदवार सहित पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
प्रवेश घेणाऱ्यांच्या हाती साहेबराव कांबळेच्या सर्मथनात पोस्टर
काँग्रेस पक्षात काल झालेल्या प्रवेशा वेळी, प्रवेश घेणाऱ्यांनी इच्छुक उमेदवार असलेले साहेबराव कांबळे यांच्ये पोस्टर घेवून प्रवेश करण्यात आल्याने, साहेबराव कांबळेचा पलडा दिवसे दिवस जड भरत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
पक्ष उभारणीत अदृश्य शक्ती म्हणजे ‘गोपाल अग्रवाल’
मागील वर्षापासून काँग्रेस पडद्याच्या मागे राहून, पक्ष संघटन वाढविण्यात व पक्षाला उभारी देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी एक अदृश्य शक्ती म्हणजे गोपाल अग्रवाल आहेत. विधानसभाभर गावागावात त्यांनी तयार केलेले नेटवर्क व कार्यकर्त्यांची फळी, यामुळे पक्षाला त्याचा फायदा होणार असल्याचे मत, आपल्या भाषणातून तातू देशमुख यांनी व्यक्त केले.
चौकट
राम देवसरकर यांचा आ. ससानेवर हल्लाबोल
उमरखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून ज्यांच्याकडे पालकत्व आहे. त्या आमदार नामदेवराव ससाने यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर स्वतः अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. आनेकांना पोलिसी कार्यवाहीत अडकवण्याचा प्रयत्न करून, आपली पात्रता सिद्ध केली. विकास कामांसाठी मतदार संघात कोणी आवाज उठविला तर जातीयवादाचा आरोप करून गुन्हे दाखल करण्याची मानसिकता असलेल्या आमदारांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला राम देवसरकर यांनी दिला.