यवतमाळ, उमरखेड : राज्यात विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते राज्यात अनेक पक्ष आपले उमेदवार मैदानात उतवरतांना दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा मतदार संघामध्ये एम.आय.एम. पक्ष आपले उमेदवार देणार असल्याची माहिती एम.आय.एम. चे जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान यांनी दिली आहे.
राज्याच्या मागील विधानसभा निवडणुकीत एम. आय. एम. चे दोन उमेदवार निवडून आले होते. 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी सोबत एमआयएम पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले होते परंतु महा विकास आघाडीच्या वतीने काहीही हालचली न दिसल्याने आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये एमआयएम पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे त्या दृष्टीने उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाचा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु असून उमरखेड – महागाव विधानसभेत एमआयएम पक्षाचा उमेदवार देणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान यांनी दिली आहे.
उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघामध्ये अल्पसंख्यांक मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे त्यामुळे एमआयएम पक्षाचा उमेदवार उभा राहिला राहिल्यास त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारावर होऊ शकतो त्यामुळे एमआयएम चा उमेदवार मतदार संघात ‘की फॅक्टर’ ठरु शकतो.