महागाव तालुक्यातील तिसरी घटना
यवतमाळ : महागाव तालुक्यातील शेतात गांजा हे पीक अधिक उत्पन्न देणारे असल्याने शेतकरी मनामध्ये कुठली भीती न बाळगता गांजा लावत असल्याने यावर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवून अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गांजा पकडण्याची महागाव तालुक्यातील ही तिसरी घटना घडलेली आहे.
महागाव तालुक्यातील पुसद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसरा येथील
बनसिंग किसन राठोड वय 33 वर्ष रा घोंसरा ता महागांव जि यवतमाळ
याचे शेतात असलेले 50 झाडे त्यांचे एकूण वजन 36 कि.लो. अंदाजे किंमत 5,76,000/- रु याचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोद करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर कारवाई ही मा पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांचे सूचनेप्रमाणे,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात API राऊत साहेब, PSI ससाणे साहेब,ASI शेख मसूद,ASI अशोक जाधव,पोलीस हवालदार गावंडे, केवटे, पोलीस नाईक सुनील माथणे, रणजित रबडे,पोलीस शिपाई महेश बाबर,यांनी केली
प्रतिनिधी
कलीम खान
यवतमाळ