section and everything up until
* * @package Newsup */?> सत्यशोधक शेतकरी संघाचे उमेदवार विजय खडसे यांच्या प्रचाराचा नारळ अमृतेश्वर संस्थान हरदडा येथे संपन्न | Ntv News Marathi

प्रतिनिधी
उमरखेड :
कालच पत्रकार परिषदेत सत्यशोधक शेतकरी संघाच्या वतीने घोषित केलेल्या विजय खडसे यांच्या प्रचाराचा नारळ आज अमृतेश्वर संस्थान हरदळा येथील सत्यशोधक शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजून 32 मिनीटा ला पाड पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम पाटील नलवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर ,सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, डॉ. विः ना . कदम, भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, उमाकांत मडके, देवानंद मोरे, प्रज्ञानंद खडसे,कृष्णा पाटील देवसरकर, यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली . यावेळी विविध मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले विजयराव खडसे यांनी आपल्या मनोगतातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे दोन वेळा पडलेल्या सर्वच माजी आमदारांना परत तिकीट दिले परंतु उमरखेड महागाव मतदार संघात मी प्रबळ दावेदार असताना सुद्धा भरमसाठ पैसा पाई उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला उमेदवारी दिली नाही . मी मागासवर्गीय असल्यामुळे माझ्यावर हा अन्याय केला गेला मला उमेदवारी दिली नसली तरी स्थानिक च्या कोणत्याही इच्छुक काँग्रेस उमेदवाराला तिकीट दिले असते तरी आणि दिलेल्या उमेदवाराला तिकीट देत असताना मला विश्वासात घेतले असते तरी कदाचित मी अपक्ष उमेदवारी भरली नसती त्यामुळेच इतर सामाजिक संघटनेसह पाठिंबा मिळाला असल्याने सत्यशोधक शेतकरी संघा मधून मला उमेदवारी दिल्यामुळे आमची बाजू भक्कम झाली आहे येणाऱ्या काळात “ऑटो रिक्षा” या निशाणी समोरील बटन दाबून मला विजय करा असे आवाहनही ते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले . यावेळी बालाजी वानखेडे, उद्धव गायकवाड, प्रजानंद खडसे, डॉ. वि . ना . कदम, प्रकाश पाटील देवसरकर, नितिन माहेश्वरी यांनी मनोगत व्यकत करून विजय खडसे यांना निवडून आणण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *