विनोद गोदबोलें नागपुर डॉ. पंजाबराव देशमुख महोत्सवात धनवटे नॅशनल महाविद्यालय ,नागपूर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे आयोजित केलेल्या एक दिवसीय व्हाॅलीबाॅल चषकामध्ये बॅरि.शेषराव वानखेडे कला वाणिज्य महाविद्यालय व हरिभाऊ आदमने महाविद्यालय सावनेर या दोन्ही महाविद्यालयात झालेल्या चुरशीच्या सामन्यात बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालयाला विजय प्राप्त झाला . बॅरि.शेषराव वानखडे महाविद्यालयाने २५-१५ व २५-१९ अशा पॉईंटनी सावनेर येथील हरिभाऊ आदमाने महाविद्यालयाचा पराभव केला. या यशामध्ये शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.राजेन्द्र राऊत यांनी तयार केलेल्या अभिनंदन खामकर, साहिल गौरकर ,रोहन राऊत, प्रज्वल सिंदूरकर, हर्षल चौधरी, चिकू चव्हाण ,आदित्य डोंगरे, प्रतीक मुरकुटे ,कुणाल देहारे या विद्यार्थ्यांच्या चमूने बाजी पटकावली.विद्यार्थ्यांच्या या यशाचे महाविद्यालयाच्या अध्यक्ष मा.कुंदाताई विजयकर, महाविद्यालयाचे विश्वस्त माननीय सुनील बाबू केदार ,मा.अनुजा ताई केदार ,मा. पौर्णिमाताई केदार- चिंचमलातपुरे व महाविद्यालयाचे प्रा.डॉ.आर.जी.टाले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व सर्व प्राध्यापक वृंदानी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले