विनोद गोडबोले नागपूर बॅरि. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे आंतरमहाविद्यालयीन पुरुष वर्गाच्या एच झोन व्हाॅलीबाॅल स्पर्धा संपन्न झाल्या .या स्पर्धेमध्ये एकूण१६ संघांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र राऊत यांनी केले होते या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय ,खापरखेडा विरुद्ध किड्स महाविद्यालय ,रामटेक हे दोन महाविद्यालय रिंगणात उतरले व २५- १८ व २५ -१९ अशा पॉईंटनी बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालयाला विजय प्राप्त झाला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर जी. टाले यांच्या हस्ते करण्यात आले मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम होतो व मातीशी जडलेलं नातं आणखीच घट्ट होत जातं असे व्यक्तव्य त्यांनी केले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. गजानन सोमकुवर होते व्हाॅलीबॉल खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचाल कायम यशस्वी होण्याचे प्रोत्साहन दिले .या सामन्यामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी अभिनंदन खामणकर, रोहन राऊत, हर्षल चौधरी, साहिल गौरकर, प्रज्वल सिंदूरकर, कुणाल देहारे यांनी बाजी पटकावली तसेच या स्पर्धेचे रेफरी श्री दिनेश वानखेडे श्री नरेंद्र ईश्वरकर व स्कोलर कु. प्रणाली ठाकरे व कु. प्रतीक्षा ठाकरे यांनी विशेष जबाबदारी सांभाळली या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.धनराज शेटे ,डॉ.,प्रतिभा गडवे, नॅक समन्वयक डॉ. संगीता चोरे डॉ. उमेश जनबंधू व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री शंकर बहादुरे ,श्री मंगल काकडे ,श्री अरविंद भड ,श्री अरुण सिंदूरकर, श्री गणेश ढोके, राजेश कठौते व श्री सतीश मकरंदे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र राऊत यांनी केले सूत्रसंचालन डॉ. संगीता उमाळे यांनी केले व आभार प्रा वंजारी यांनी व्यक्त केले