♦️उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

♦️जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते. बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसिलदार,गट विकास अधिकारी आणि नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
