विनोद गोडबोले नागपूर
खापरखेडा – स्थानिक नवीन बिना बौद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळ आणि राहुल नवयुवक संघ शाखा नवीन बिना, भानेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात तथागत बुद्ध, व विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला अतिथी दामप्त्य विनायक गौरकर व तुळसाबाई गौरकर यांच्याहस्ते माल्यार्पण, पंचशील ध्वजारोहण करून व सामुहिक बुद्ध वंदना घेवून करण्यात आली. यावेळी मधुकर गौरकर, धम्ममित्र वनदेव लांजेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. मीना नरेश ढोके यांनी यावेळी गीत प्रस्तुत केले. भारतीय बौद्ध महासभा नवीन बिना व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला झालेल्या धम्मदीक्षा समारंभात धम्म सेनापती वामनराव गोडबोले यांची भूमिका विषद करतांना धम्म पथावर चालण्याचे आव्हान केले. याप्रसंगी सचिव मुकेश बागडे, अनिल लांजेवार, नरेश डोंगरे, तुळशिराम बागडे, लक्षमण लांजेवार, विनायक गौरकर, मनोहर गजभिये, कृष्णाजी वासनिक, ओमप्रकाश गौरकर, किशोर चव्हाण, भैयाजी सोनटक्के, अशोक कांबळे, रमेश बागडे, उदाराम धनवटे, अरुण नारनवरे, मिलिंद गौरकर, आनंद वासनिक, मास्टर तनिष्क वासनिक, अद्विक बागडे, आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळाच्या कांता बागडे, कुसुम गौरकर, अंजना मेश्राम, बेबी वासनिक, राधा गौरकर, रेखा लांजेवार, नंदा सोमकुंवर, मीरा डोंगरे, सत्याफुला कांबळे, मीना मेश्राम, वंदना गणवीर, मीना ढोके, लता खोब्रागडे, मालवी नारनवरे, सुनंदा लांजेवार, सारिका तागडे, कल्पना वासनिक, प्रिती गोलाईत, प्रगती बागडे, विशाखा ढोके सहित बहुसंख्येने बाल-बालिका व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता २२ प्रतिज्ञा घेवून करण्यात आली. प्रास्ताविक प्रिया डोंगरे, सूत्रसंचालन कोषाध्यक्ष रविंद्र ढोके तर आभार रोहिणी धनवटे यांनी मानले.