राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाच्या वतीने ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर काछीपुरा चौक येथे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी “भव्य अभिवादन सभा “आयोजित केली होती या सभेला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक श्री आनंद शिंदे, श्री सार्थक खैरनार व श्री राहुल शिंदे ,श्री अनिल हिरेखन,प्रमुख उपस्थिती म्हणून श्री शिलवंत सोनटक्के,संतोष नरवाडे,प्रमोद थुल उपस्थित होते सर्वप्रथम परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला हारार्पन करण्यात आली व दीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी मा आमदार प्रकाश गजभिये यांनी आपल्या भाषणात सांगितले की नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीची माती आपल्या कपाळlला लाऊन आशीर्वाद घेऊन आपल्या गावाला जातात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी करोडो बौद्ध बांधवांना शस्त्राविना धम्मदीक्षा दिली हे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी करून आम्हाला जीवन जगण्याचा सुंदर मार्ग दाखवला यावेळी अभिवादन सभेला लाखो कार्यकर्ते उपस्थित होते
सुप्रसिद्ध गायक श्री आनंद शिंदे यांनी बुद्धभीम गीते गायली लोकांनी त्यांना भरपूर साद दिली अभिवादन सोहळा संपन्न करण्यास हाजी शकील मनोज नागपूरकर भूपेंद्र सनेश्वर,विकि खंडाळे मो शादाब मो रज्जाक भाई विजय तालेवार प्रवीण नारनवरे अमोल डार्लिंगे आदीनी परिश्रम घेतले