१७ वर्ष वयोगटातील मुलींनी ४०० किलो आत वजनगटात साखळी सामन्यात जेनेली स्कूल कामठी २-०उपांत्य फेरीत महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा यांना २-० ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला, व अंतिम सामन्यात बी.के.सी.पी.कन्हान यांच्या वर २-० ने दणदणीत विजय मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
प्रथम क्रमांक प्राप्त करणारे शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील रस्सीखेच खेळाडू,चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय शालेय रस्सीखेच स्पर्धेत नागपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे रस्सीखेच स्पर्धेत सानिया प्रेम भलावी (कर्णधार), धनश्री रुपराव कांबळे, अंकिता नरेंद्र धुर्वे, ऐन्जल विजय गौर,शिवानी रामभाऊ माहुरे, सारिका आशिक कटेरिया, सुजाता आशिक कटेरीया, प्रशंशा रामसूफल नाविक, मीरा मेहिलाल गुप्ता यांनी उल्लेखनीय कामगिरी केली प्रशिक्षक अर्पिता जालंदर व्यवस्थापक पुष्पा बढिये यांनी खेळाडूंना मोलाचे सहकार्य केले आहे.
विजयी खेळाडूंचे मुख्याध्यापक विमलकुमार मिश्रा,पर्यवेक्षक विना पांडे, पुष्पा बढिये, विपीन शर्मा, सुनील जालंदर, किशोर बक्सरिया आदींनी कौतुक केले.