विनोद गोडबोले नागपूर विभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर, येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले. 17 वर्ष वयोगटातील मुलांनी 480 किलो वजनगटात उपांत्य फेरीत वलनी हायस्कुल वलनी यांना 2-0 ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला, व अंतिम सामन्यात बी.के.सी.पी.कन्हान यांच्या वर 2-0 ने दणदणीत विजय मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांक प्राप्त करणारा महाराष्ट्र विद्यालयाचा संघ. कुशल आवळे(कर्णधार),हर्ष सिंदूरकर, नैतिक गौरखेडे, स्वरित गौरखेडे,आशुतोष चौधरी, अक्षद लोखंडे, अभय बंदेवार, मंथन ढोके, श्लोक काकडे. 19 वर्ष वयोगटातील मुलींनी 440 किलो वजनगटात अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांक प्राप्त करणारा महाराष्ट्र विद्यालयाचा संघ आकांक्षा रडके (कर्णधार),नेहा मुरमारे,नंदिनी लोखंडे,मुस्कान गंगभोज,शालीनी मारबते, त्रुप्ती मारबते,मानवी भेलावे,पलक थुलकर,खुशी शेळके 19 वर्ष वयोगटातील मुलांनी 560 किलो वजनगटात अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांक प्राप्त केलेला महाराष्ट्र विद्यालयाचा संघ अजिंक्य ब्रम्हे(कर्णधार), यश निखाडे, निरंजन बिंझाडे, समीर शेंडे, रिश्मित पाटील, नयन पाटील, प्रथमेश हेलोंडे, महेश युवनाते, शंतनू ओकटे प्रथम क्रमांक प्राप्त करणारे रस्सीखेच खेळाडू,चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय शालेय रस्सीखेच स्पर्धेत नागपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनीलबाबू केदार, सचिव सुहासताई केदार, शाळा समितीचे उदय महाजन, दिवाकर घेर, दुलिचंद कुंभारे, अरुणाताई शिंदे, दामोदर हाते, प्रकाश माटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण वडस्कर, उपमुख्याध्यापक चंद्रशेखर लिखार, पर्यवेक्षक प्रमोद ईखे,वरीष्ठ लिपीक विजय वासनिक,क्रीडाशिक्षक धर्मेंद्र सुर्यवंशी, धैर्यशील सुटे व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने खेळाडूंचे अभिनंदन केले.