उमरखेड : दिवाळी निमित्त उमरखेड नगरीमध्ये युथ फाऊंडेशन उमरखेड द्वारा आयोजित संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम गुरुवार रोजी जगदंबा देवी मंदिर महागाव रोड उमरखेड येथे घेण्यात आला.
वर्षातील सगळ्यात मोठा सण म्हणून दिवाळी हा मानला जातो या सणा निमित्त संपूर्ण वातावरण आनंदमय व हर्षोल्लासात नाहुन निघते दिवाळीचा आनंद व्दीगणीत करण्यासाठी युथ फाउंडेशन उमरखेड कडून दरवर्षी संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात येते यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुवर्य पंडित विश्वनाथ वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी नामवंत गायक वादक व बालकलाकार उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक दिलीप केशेवाड (संगीत विशारद), अनिल वाघ (संगीत विशारद), प्रा. ज्ञानेश्वर बोंपीलवार (MA music,NET,संगीत अलंकार) स्वाती बोंपीलवार (MA music, NET संगीत विशारद) प्रा. नामदेव बोंपीलवार MA music, NET. संगीत विशारद) प्रशांत आत्राम (संगीत विशारद) पि. डी. शिंदे सर (संगीत विशारद) विक्रम कटकोजवार (संगीत विशारद) डॉ. शुभम सावळकर (संगीत विशारद) गौरव तेला, संध्या देशमुख, माधवी पांडे, मनोज पंचवार ,डॉ. श्रीकांत खंदारे, विठ्ठल खूपसे, अभिलाष पंडागळे (संगीत विशारद) चंदू भालेराव (संगीत विशारद) कु. स्वरा वाघमारे कु. सुखदा झाडे कु. ज्ञानदा कटकुजवार कु. गिरीजा देशमुख चि. शुभंकर कटकुजवार यांनी आपल्या सुमधुर गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विवेक पत्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट बासरी वादक श्रीनिवास लंकावाड व तबलावादक श्री. प्रथमेश राणे यांनी सहकार्य केले. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासोबतच उपविभागीय अधिकारी व प्रशासनाच्या सहकार्याने मतदान जन जगृतीचाही कार्यक्रम घेण्यात आला यासाठी सतीश दर्शनवाड (गट शिक्षण अधिकारी उमरखेड) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. शिंदे, राहुल झाडे, कु. वैभवी हादरगे यांनी केले. आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अजित नलावडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युथ फाउंडेशन उमरखेडचे निखिल कोल्हे, अक्षय वाघमारे, विजय वाघमारे, डॉ सौरभ देशमुख व इतर सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले.
