सचिन बिद्री :उमरगा
तीन लाख रुपयापर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व मुलींसोबतच मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. उच्चशिक्षीत, सामाजीक भान असणारे व शिक्षणाचा लाऊडस्पिकर पॅटर्न राबविणाऱ्या आदर्श शिक्षकाला निवडून दया असे मत माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

धाराशिव जिल्ह्यातील २४० उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा), काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण स्वामी यांच्या प्रचारार्थ गुरूवार रोजी शहरातील छ.शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते,
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष भैया शिवाजीराव मोरे हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण स्वामी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील,विजयकुमार सोनवणे, महेश देशमुख, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, बाबुराव शहापुरे, रझाक अत्तार, राजु तोडकर, अॅड. शुभदा पोतदार, अॅड. शितल चव्हाण, संजय पवार, नानाराव भोसले, अॅड. सयाजी शिंदे, अर्जुन बिराजदार, बलभिम पाटील, अभिषेक औरादे, विजय वाघमारे, विजय दळगडे, एम. ओ. पाटील, विलास राजोळे, याकुब लदाफ, अरूणकुमार रेणके, अमित रेड्डी, सुधाकर पाटील, प्रदीप जाधव, विजय वाघमारे, मधुकर यादव, दादासाहेब गायकवाड,अशोक मम्माळे,अरविंद पाटील,एम ओ पाटील, प्रफुल गायकवाड, अप्पा कारभारी, अविनाश माळी, चव्हाण, मुदकन्ना,समद वर्नाळे उपस्थित होते.
विद्यार्थी, महीला व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या व सर्वधर्म समभाव असणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून दया.उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार करणाऱ्या, सत्तेसाठी विचारांना तिलांजली देणाऱ्या या भ्रष्टाचारी महायुती सरकारचा पराभव करण्याचे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.

बाबा पाटील,आश्लेष भैया मोरे, अॅड. शितल चव्हाण, रेणके, अॅड. सयाजी शिंदे, सुधाकर पाटील यांची यावेळी भाषणे झाली. मधुकर यादव यांनी प्रास्ताविक केले.अॅड. एस. पी. इनामदार यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले. यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.