छत्रपती संभाजीनगर
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे सालाबाद प्रमाणे दर वर्षी कार्तिक पौर्णिमा या दिवशी सावळदबारा येथे शाली वस्ताद बाबा यांचा उर्स व नागोबा महाराज हरिहर मंदिर यांची यात्रा असते तसेच कुस्त्यांची दंगल आखाडा भरवीला जातो या वर्षी ही दिनांक १५ / ११ / २०२४ शुक्रवार रोजी म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी कुस्त्यांची भव्य अशी दंगल आयोजित करण्यात आली आहे दिनांक

१४ / ११ / २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता गावा मधे शाली वस्ताद बाबा यांचा संदल मिरवणूक कार्यक्रम काढण्यात येईल व तसेच दुसऱ्या दिवशी कार्तिक पौर्णिमा च्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान गावामध्ये दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात येईल त्या नंतर कार्तिक पौर्णिमा च्या दिवशी दुपारी १ वाजता कुस्त्यांची दंगल आखाडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि शेवट ची कुस्ती ही ५ वाजता लावण्यात येणार असून तसेच इनाम पैलवान बघून देण्यात येईल अनेक वर्षांपासून परंपरागत सालाबाद प्रमाणे सावळदबारा येथे हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतीक म्हणून सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्रित येणून सर्वच गावकरी मिळून गाव वर्गणी करून सर्व जाती धर्माच्या व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने उर्स यात्रा व यात्रे निमित्ताने होणारे कार्यक्रम उत्सव साजरे करण्यात येतात त्या उर्स यात्रेला शाली वस्ताद बाबा दर्गाह व नागोबा महाराज ( हरिहर ) मंदिर यांना रंग रांगोटी करून लाइटिंग रंग बेरंगी सुंदर रोषणाई ने सजविण्यात येतात तरी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्तित राहावे असे आवाहन उर्स यात्रा व आखाडा पंच कमिटी कडून करण्यात आले आहे कुस्त्यांचे नियम अटी पंचाचा निर्णय अंतिम राहील व कुस्ती दरम्यान पैलवानाला दुखापत व जीवित हानी झाल्यास याला स्वतः पैलवान जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात यावी असे ही या उर्स यात्रा कुस्ती आखाड्याचे पंच कमेटी यांनी सांगितले

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव छत्रपती संभाजीनगर