वाशिम : वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदार संघाच्या वंचितच्या अधिकृत ऊमेदवार मेघाताई डोंगरे(मनवर) यांच्या प्रचारार्थ दि.१६ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शेकडो कार्यकर्त्यांच्या ऊपस्थीतीत सभा पार पडली.या सभेमध्ये सुजातदादाने विरोधकांचा खरपुस समाचार घेत वंचितची ठाम भुमिका विशद केली.
बाळासाहेब आंबेडकर हे मॅनेज झालेत हा विरोधकांचा अपप्रचार सुरु असुन वाशिम मंगरुळपीर विधानसभेमधील वंचितची विजयाकडची घोडदौड बघता विविध प्रकारे वंचितला बदनाम करण्याचा डाव सुरु असल्याचे सांगत जे नरेंद्र मोदीला मॅनेज करण्याचे जमले नसुन पक्षात मोठे होवुन सोडुन जाणार्यांना मॅनेज होईल का? असा टोला लावत सुजातदादा आंबेडकर यांनी विरोधकांच्या अपप्रचाराचा भंडाफोड करत वंचितची ठाम भुमिका आपल्या कार्यकर्त्यासमोर ठेवुन वंचितच यावेळी आमदारकीचा विजय खेचुन आणन्याचा निर्धार यावेळी सभेमधुन व्यक्त केला.

दि.१६ नोव्हेंब रोजी दुपारी मंगरुळपीर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वंचितचे युवा नेतृत्व सुजातदादा आंबेडकर हे वंचित बहुजन पार्टीच्या उमेदवार मेघाताई डोंगरे यांच्या प्रचार सभेमधुन बोलत होते.त्यांनी वाशिम जिल्ह्याच्या आकांक्षित बाबत प्रकाश टाकत वंचितच्या माध्यमातुन विकासगंगा आणन्याचा संकल्पही यावेळी बोलुन दाखवला.जे गद्दार होते ते गेले माञ निष्ठावान कार्यकर्ते हे वंचितची धुरा आहेत आणी याच माध्यमातुन विजय खेचुन आणन्याचा निर्धारही व्यक्त केला.या सभेला समता सैनिक दलासह गावाखेड्यातुन शेकडो नागरीकांसह वंचितच्या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती.
- फुलचंद भगत
मो. 8459273206