section and everything up until
* * @package Newsup */?> निवडणूक भत्ता कर्मचाऱ्यांना आता ऑनलाइन मिळणार | Ntv News Marathi

फुलचंद भगत
वाशिम:-मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वी मतदान संपताच रोख स्वरूपात भत्ता मिळत होता. या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन मिळणार आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपात ट्रायल पेमेंटसाठी एक रुपया पाठविण्यात येणार असून पूर्ण रकमेसाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.बुधवारपासून उर्वरित रक्कम प्रत्येकाच्या खात्यात जमा होईल.
प्रत्येक मतदार केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता देण्यात येतो. लोकसभा निवडणुकीपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. यापत्रात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक ड्युटीवर असलेले मतदान केंद्राध्यक्ष/ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार निवडणूक व आहार भत्ता हा ऑनलाइन स्वरूपात देण्यात यावा. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्याचा तपशील पीपीएमएस (पोलिंग पर्सोनेल मॅनेजमेंट सिस्टिम) या स्वॉप्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे.पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे. आज (सोमवारी) यातील तपासणी करिता प्रत्येकाच्या खात्यावर प्रयोगिक तत्त्वावर एक रुपया पाठविण्यात येणार आहे. मतदान पथकांना रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपये ट्रायल पेमेंट मिळालेले नाही. त्यांचे बँक खाते अद्ययावत करण्यात येणार आहे. बॅंक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी (ता. १९) दुपारी तीन वाजता संपूर्ण यादी बॅंकेत दिली जाणार आहे. ही रक्कम बॅंकेने बुधवारी एक वाजता अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे.

पुर्वी रोखीने मिळत होता निवडणुक भत्ता

पूर्वी मतदान संपताच रोखीने मिळणारा भत्ता यंदा ऑनलाइन मिळत असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे. मात्र, बुधवारीच संबंधित बॅंका ही रक्कम जमा करणे कठीण आहे. मुळात या दिवशी बॅंकेला सुटी आहे. अनेक राष्ट्रीयकृत बॅंकेचे कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर आहेत. यामुळे भत्तावाटप बुधवारीच होईल असे सांगता येत नाही. यामुळे यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार आहे. दरम्यान आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत भत्ता वाटप करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखावर(pro) असे मतदानाची वेळ संपल्यानंतर इव्हीएम मतमोजणी केंद्रापर्यंत पोचविण्याची जबाबदारी प्रमुखांसह सर्व कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, यातील काही कर्मचारी वेळेअभावी दुसऱ्यावर जबाबदारी सोपवून निघून जात. यासाठी भत्ता मिळण्याचा अडसर होता. आता हा भत्ता ऑनलाइन मिळणार असेल तर केंद्र प्रमुखाचे यावरील नियंत्रण सुटणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *