मंगरुळपीर तालुक्यात कारवाई
फुलचंद भगत
वाशिम:-पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वाशीम पथकाने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टाकलेल्या छाप्यात वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारू किंमत 84200/-₹ व एक मोबाईल असा एकूण 111200/- रू चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशन मंगरूळपिर जि.वाशिम दिनांक 18/11/24 रोजी ही कारवाई करून पोलिसांनी अप न. 2024 क. 65 ई मदाका नुसार आरोपी आकाश पांडुरंग मानके,वय 35 वर्ष रा. शेलुबाजार जि. वाशिम या आरोपीस घटनास्थळ शेलू बाजार तालुका मंगरुळपिर जिल्हा वाशिम येथून ताब्यात घेतले आहे.सदरहू पकडलेली दारू निवडणुकीत मतदारांना प्रभावीत करण्यासाठी तर वापरली जाणार नव्हती ना? याचा तपास पोलीस करीत आहेत. हा पकडलेला दारू साठा नेमका कोणाचा याची बरीच उलटसुलट चर्चा होत आहे.
या कारवाई पथकामध्ये पोलिस हवालदार दिपक सोनवणे,आशिष बिडवे,पोना प्रविण राऊत,पोकॉ.अमोल इरतकर,महीलापोहवा सुष्मा तोडकर स्था.गु.शा वाशिम यांचा समावेश होता.