पोलिसांच्या कारवाई नाममात्र,संवेदनशील यवतमाळला अवैध धंद्यांना आला उत
यवतमाळ – शहराच्या विविध भागात मटका जुगाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
युवासह वयोवृद्ध मोठ्या प्रमाणात या मटक्या च्या आहारी गेले आहे.
याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर ती होत असून कर्जबाजारी पणाचे प्रमाण सर्वत्र वाढत आहे.
या खेळामध्ये खेळणारे कंगाल होत आहे तर खेळविणारे मालामाल होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना कुटुंबातून उध्वस्त करणारा हा मटका जुगार यवतमाळ शहरात राजरोसपणे सुरू आहे शहरात मटका, जुगार,भिंगरी, व अवैध दारू विक्री असे अनेक धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष या व्यवसायाला बळ देत आहे.असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.मात्र अधिकाऱ्यांच्या लक्षात का येत नाही.हे सुद्धा पाहणे अपेक्षित आहे.

विधानसभेत गाजला जुगाराचा व वसुली बाज पोलिसाचा प्रश्न..
यवतमाळ शहरातील जुगाराचा व वसुली बाज पोलिसांचा प्रश्न विधानसभेत गाजला असताना सुद्धा कुठल्याही कारवाया झाल्या नाही. त्यामुळे अवैध धंद्यांना वरिष्ठांचे पाठबळ दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अवैध धंदे खपवून घेणार नाही. अशी तंबी दिल्यानंतरही यवतमाळ शहरात खुलेआम जुगार अड्डे व भिंगरी सुरू आहे.
प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ