वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून धुळ्यातील एकाला 13 लाखाचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या तिघांच्या मुसक्या गुजरात मधील सुरत येथून आवळण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे. ठकबाजीचा हा प्रकार 13 सप्टेंबर 2024 रोजी घडला होता. या प्रकरणाचा तपास चार महिन्यापासून सुरु असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

जय श्रीकृष्णा इंटरप्रायजेस धुळे या नावाने इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना वीज वितरण कंपनी धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ महाराष्ट्र विज वितरण कंपीनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांचे काहीतरी महत्वाचे काम आहे, त्यांचा फोन घेणे असा कॉल आला. त्यानंतर थोड्याच वेळात जिजाबराव पाटील यांचे व्हाट्सअपवरली अनोळखी नंबरवरुन कॉल आला व त्यांनी ‘मैं लोकेश चंद्रा बोल रहा हुं, डायरेक्टर मिटींग में बिझी हु, मेरे अंकल सुरत के हॉस्पीटल मे अॅडमिट है, उनका ऑपरेशन होना है, तो आप मुझे 8 लाख रुपये अरजेंट मेज दिजीए, मैं आपके पैसे आज शाम तक लौटा दूंगा’ असे सांगितले. म्हणून फिर्यादीने तात्काळ खातेधारकाच्या खातेवर नेट बँकिंगद्वारे ट्रान्स्फर केले.

त्यानंतर पुन्हा दोन तासांनी फोन आला व अंकलच्या उपचाराकरीता आणखी 5 लाख रुपये पाठविण्याची विनंती केली. पैसे पाठवित असताना चंद्रा यांनी कोणत्याही प्रकारचे पैसे मागितले नसल्याचे समोर आले. आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर येताच धुळे सायबर पोलीस ठाण्यात जिजाबराव पाटील यांनी फिर्याद दाखल केली होती.

आणि या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत धुळे सायबर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी तपास सुरू करून गुजरात राज्यातील सुरत येथून यशवंत काशिनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई आणि विजय शिवहरी शिरसाठ यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *