पथर्डी:-पाथर्डीत अवैध मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख ५९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


कृष्णा सुरेश फुलमाळी, (वय २७, रा.साकेगाव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर), बाळासाहेब शंकर सोनटक्के, (रा.सोनटक्के वस्ती, पाथर्डी), प्रेम मिश्रा, रा.अहमदाबाद, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी शहरात बाळासाहेब सोनटक्के हा राहत्या घरातून अवैध सुगंधी तंबाखू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले.

त्याच्याकडून सुगंधीत तंबाखूचे ७४ पुडे, ५० किलो तंबाखू व सुपारी मिश्रीत मावा, १० किलो बारीक सुपारी, एक इलेक्ट्रीक लोखंडी मशीन व प्लास्टीक पुडया, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.