♦️येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) –
♦️रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या अभियानात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा यांच्या वतीने येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा येथे निबंध, वक्तृत्व,रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
दिनांक १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान धाराशिव जिल्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन सुरू आहे . दिनांक २२ रोजी येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . या स्पर्धेत रस्ता सुरक्षा या विषयी च्या विषयवार वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेत जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिन पाटील, आर टी ओ इन्स्पेक्टर पौळ मॅडम,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर काशीद, स्वाती पाटील, प्रियंका काकडे, उषा दिडवळ, प्रशांत लोंढे उपस्थित होते . यावेळी सर्व विदयार्थाना मोटर वाहन नियमाविषयी माहिती सांगण्यात आली व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आले. .