लातूर प्रतिनिधी
लातूर, विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकूर मॅडम यांची भेट घेऊन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेच्या मुदतवाढीसाठी तसेच मानधन वेळेवर मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेच्या मुदतवाढीची गरज व मानधन वेळेवर मिळण्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो, मात्र मुदत संपल्यानंतर पुढील संधी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, प्रशिक्षणार्थींना नियमित मानधन वेळेवर न मिळाल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी विद्यार्थी हक्क कृती समितीचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश परमेश्वर सावंत, उपाध्यक्ष अमित गिरी, प्रवक्ता अनुराधा मोरे, सहघटक विशाल मोरे आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लातूर सर्व शिक्षक नराळे राम, एरटेल गणेश, सोनटक्के ऋषिकेश, राठोड विलास, मांडे ईश्वरप्रसाद, केंद्रीय पूजा, शिंदे सुनीता, लांडगे अमोल, कैले स्वाती, निकिता प्रमोद, सुचिता अमित, प्रमोदिनी पवार, सुलक्षणा शिंदगे, प्रतिमा गादे, भोसले राजेंद्र, कैले मारुती, महरून पठाण, मुस्कान सय्यद इत्यादी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवेदनाची योग्य दखल घेतली असून संबंधित विभागाकडे यासंदर्भात कार्यवाहीसाठी पुढील पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले.