जामखेड शहरातील रस्त्या बद्दलच्या सततच्या संजय कोठारी यांच्या तक्रारीची गांभीर्याने दरवल घेत
संजय कोठारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चार दिवसात रोडचे काम चालू करणार असल्याचे उपअभियंता लाभाजी घटमळ यांचे आश्वासन
धनेश्वर कंट्रक्शन च्या अधिकाऱ्यांनी संजय कोठारी यांच्या ऑफिसला येऊन लवकरच काम सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले आहे .
वारंवार रोड बाबत तक्रारी केल्याने
लवकरात लवकर शहरातील रोडचा प्रश्न मिटवू धनेश्वर कंट्रक्शन प्राइवेट लिमिटेड आणि श्री गणेश कंट्रक्शन याचे प्रोजेक्ट मॅनेजर सचिन पवार यांनी आश्वासन दिले.
महत्त्वाचे म्हणजे शहरातील विश्व क्रांती चौक पासून राहिलेला अर्धा पट्टा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करून घेतो तसेच खर्डा चौक ते बीड रोड कॉर्नर येथे अतिक्रमणचा प्रॉब्लेम असल्यामुळे रोडला वेळ लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे रोड साठी २३.६ मीटर जागा लागते आणि नगरपरिषदेसाठी सहा मीटर जागा लागते एवढी जागा खर्डा चौक ते बीड रोड मिळत नाही त्यामुळे कामास दिरंगाई होत आहे असे पीडब्ल्यूडी नेमलेले शीलादित्य मंडल ऑथॉरिटी इंजिनियरचे रेसिडेंट इंजिनियर म्हणाले. यावेळी कित्येक वर्षापासून जामखेड शहरातील रोडचा प्रॉब्लेम मिटत नाही यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी वेळोवेळी रोड बाबत मागणी करत आहेत कधी खड्डे बुजवली जातात तर कधी रोडचे छातुरमातुर काम केले जाते तर रोडवर रोजच पाणी मारल्याने चिखलाचे गट्टे होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे आता सध्या सौताडा घाटामध्ये तसेच सौताडा गावामध्ये या कंपनीचे काम रात्रंदिवस चालू आहे. महत्त्वाचे म्हणजे हापटेवाडी ते घाटापर्यंत अगोदर रोड करून सौताडा घाट काम करणार आहोत सौताडा घाटातील रोड साठी फॉरेस्ट कडुन मान्यता मिळालेले नव्हती म्हणून काम लांबणीवर पडले असे यावेळी पवार म्हणाले तसेच पुढील आठवड्यात उपअभियंता लाभाची घटमळ यांनी आज सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दूरध्वनीद्वारे सांगितले लवकरात लवकर काम चालू करून पूर्ण करण्याचा उद्देशाने आम्ही कालच नाशिक ला मीटिंग घेतलेली आहे.
टीप
विंचरणा नदीचा जुना पूल पाडून नवीन करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे
सध्या विंचरणा नदीवर एक साईडचा पूल झालेला आहे दुसऱ्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून फार मोठा घात होण्याची शक्यता आहे कारण त्या पुलाला बरीच वर्षे झाले असून खालच्या बाजूने सर्व गज उघडे पडले आहेत धनेश्वर कंट्रक्शन ने सदर विंचरणा नदीचा जुना पूल टेस्टिंग केला असून तो निकामी झालेला आहे परंतु तात्कालीन अधिकारी चीफ इंजिनियर आणि सुपरडेंट इंजिनियर यांनी जुना पुलालाच डागडूजी करून चालू करावा असे सांगितले आहे परंतु हे आम्हाला मान्य नाही असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले
या चर्चे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ,भारतीय जैन संघटने जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी, राजेश गांधी, तसेच धनेश्वर कंट्रक्शन चे सचिन पवार( प्रोजेक्ट मॅनेजर )शिलादित्य मंडल अथॉरिटी इंजिनियर उपस्थित होते.
नंदु परदेशी जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124