राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शिवशंभू गौरव पुरस्कार वितरण सोहळा दि.१९ जानेवारी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पत्रकार, राजकीय, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गंगापूर येथील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव नरोडे यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये मायाताई गुंजाळ, प्रमोद पाटील, सुवर्णाताई जाधव, ज्ञानराज काळे, कल्याणी तौर तसेच अनेक पुरस्कार मूर्तीना पुरस्कार देऊन
सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी राजेजाधव (लखुजी जाधवांचे वंशज), कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जालिंदर गागारे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून हनुमंत वडजे, भानुदास पाटील पवार (पंचायत समिती सदस्य गंगापूर), उमेश कोल्हे, विलास खवणे,
साहित्य परिषद
भीमराव वरपडे, उत्तमराव वरपडे, सुरेशराव जंबुकर, काशिराम वरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संघटनेचे अध्यक्ष संभाजी दादा पाटील, प्रदेशाध्यक्ष के. के. पाटील, मुख्य सचिव जान्हवीताई जंबुकर, सहसचिव राहुल दादा मोरताटे, प्रदेश कार्याध्यक्ष बबन इथापे,
मुख्य खजिनदार श्रावणीताई अनभवणे, महिला प्रदेशाध्यक्ष दिपाली वाव्हळे, महिला प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई अंकुशे, महिला संपर्कप्रमुख अनिताताई पाटील, प्रदेश महिला कार्याध्यक्ष शशिकलाताई काळे, संघटना निरीक्षक धनंजय गुरव, पुणे महिला शहराध्यक्ष अर्चनाताई पाटील नांदेड, घाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, मुंबई इत्यादी जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सुषमा वाघ यांनी सांभाळली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलासराव अंकुशे यांनी केले तर राहुल मोरताटे यांनी आभार मानले.
प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर छत्रपती संभाजी नगर