♦️गंगापूर तहसील कार्यालयात आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
गंगापूर, प्रतिनिधी : गावागावात ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी यांनामाहिती असते. कुणाच्या नावे घर आहे, कुणाच्या बिल्डिंग आहे. याचा सर्वे करून खऱ्या गरजवंत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्या. अशा सूचना आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर येथे तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक, नगरपरिषद अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी व्यासपीठावर तहसिलदार नवनाथ वगवाड, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, सुहास वाघचोरे, डॉ. पल्लवी अभोरे, किशोर धनायत, मधुकर वालतुरे, संतोष जाधव, नंदकुमार गांधीले, अमोल जाधव रवीद्र चव्हाण, भाऊसाहेब पदार, प्रदीप पाटील, अमोल जगताप, मारूती खैरे, भागेश गंगवाल, फैसल चाऊस, राहुल वानखेडे, राकेश कळसकर , संजय पांडव, सावळीराम थोरात, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना बंब म्हणाले की, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी घरकुलाबाबद सरपंचांनी दिलेल्या याद्यांचा आप आपल्या स्तरावर लाभधारकांची शहानिशा करूनच पुढे ते पंचायत स्तरावर अहवाल पाठवावेत. जर कोणी खऱ्या लाभधारकाना वंचित ठेऊन दुमजली असणाऱ्यांची नावे देण्यासाठी दडपशाही आणत असेल तर अशा वेळी त्या ठरावात अधिकाऱ्यांनी आपले मत नोंदविण्याचे आवाहन करून नैसर्गिक न्याय प्रमाणे काम करून चुकीच्या कामांना दाद देऊ नये अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान यावेळी रामेश्वर गवळी, कृष्णकांत व्यवहारे, गोपाल वर्मा, रजाक पठाण, अतुल रासकर, प्रशांत मुळे, ज्ञानेश्वर सवई , योगेश चव्हान, आप्पासाहेब पाचपुते, ताहेर पटेल, बंडू कळसकर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
आमोल पारखे गंगापुर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर