फुलचंद भगत
वाशिम : सध्या सण उत्सव यात्रेचे दिवस असल्यामुळे श्रीक्षेत्र बाहिरम येथे गेलेल्या,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सन्मान प्राप्त समाजसेवी संजय कडोळे यांनी श्री बहिरीनाथ दर्शन करून यात्रेची पहाणी केली.यावेळी त्यांनी भाविकांशी व प्रामुख्याने हंडी विक्रेत्यांशी विशेष संवाद साधला.तसेच आपल्या घरामध्ये मातीच्या भांड्याचा (खास करून हंडी आणि तवा) जास्तित जास्त वापर रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण केल्यास आपले अन्नपदार्थ स्वादिष्ट होऊन रुचकर लागते.शिवाय आपल्या आरोग्यात सुधारणा होऊन विविध आजाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होते असे उदाहरणासह स्पष्ट केलं. फ्रिजच्या पाण्याने पाण्यामधील पोषणतत्व कमी होतात तर मातीच्या माठामधील थंडगार पाण्याने तहान भागून शांती व समाधान लाभते.माठातील पाणी अमृतजल असते.छोट्या मोठ्या हंडी मध्ये दही,दूध,अन्नपदार्थ साठवून ठेवता येतात.आपले पूर्वज पूर्वी स्वयंपाक गृहामध्ये मातीची भांडे वापरीत होते.त्यामुळे त्यांचे आयुष्यमानही वाढत असे.पूर्वी धन धान्य मातीच्या हंडीत साठवून ठेवत असल्यामुळे घरोघरी हंडीच्या उतरंडी असायच्या असेही गोंधळी लोककलेचे समाजप्रबोधनकार संजय कडोळे यांनी स्पष्ट केले.
