नदीपात्रातून रेतीची चोरी करीत असताना धाड घालून पोलिसांनी रेती भरलेले तीन ट्रॅक्टर जप्त केले. रावणवाडी पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी पहाटे ४ वाजता ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत १५ लाख १८ हजार रुपये आहे.

या धाडीत पथकाला रेतीचे अवैधरीत्या खनन करून भरलेले तीन ट्रॅक्टर मिळून आले. पथकाने तीन ट्रॅक्टर किंमत १५ लाख रुपये व तीन ब्रास रेती १८ हजार रुपये असा एकूण १५ लाख १८ हजार रुपयांचा माल जप्त केला.