येरमाळा प्रतिनिधी – (सुधीर लोमटे ) ता.५ –

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती, यांच्या वतीने शंकरनगर अकलूज येथे (ता.१ व २ फेब्रुवारी ) २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील स्मृती चषक प्रसिद्ध लावणी नृत्य स्पर्धेत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील कालिका सांस्कृतिक लोककला केंद्राने प्रथम क्रमांक मिळवला.

लावणी ही महाराष्ट्राची जग प्रसिद्ध पारंपरिक लोककला म्हणुन प्रसिद्ध आहे. सध्या डिजिटल युगातही लावणी लोककला जपण्याचं आणि या लावणी लोककलेला केवळ राजाश्रयच नाही तर लोकाश्रयही देण्याचे काम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूजच्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीने केले आहे.लावणी ही महाराष्ट्राची शान आणि मराठी रसिक मनाचा प्राण मानली जाते. कालप्रवाहात अविरतपणे २६ वर्षे चाललेल्या लावणीचा प्रवाह थोडासा थांबला होता. तोच प्रवाह अखंडितपणे प्रवाहीत करण्यासाठी कलाकारांच्या व कला रसिकांच्या आग्रहास्तव सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने २०२४ ला पुन्हा प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन शंकर नगर येथे चालु करण्यात आली.
१ आणि २ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या या प्रसिद्ध लावणी स्पर्धेत राज्यातील दहा कलाकेंद्र सहभागी झाले होते त्यात चोराखळी (ता.कळंब) च्या निर्मला आष्टीकर यांच्या कालिका सांस्कृतिक लोककला केंद्राने प्रथम पारितोषिक पटकावले.

चौकट…..या स्पर्धेत मुजरा, गवळण,बैठकलावणी,समूहलावणी नृत्य,छक्कड,तबला,ढोलकी जुगलबंदी नृत्य,पारंपरिक लावणी नृत्य सादर केले या सर्व प्रकारात कालिका कला केंद्राने उत्कृष्ठ सादरीकरण केल्याने त्यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला.

( मुजरा बैठक लावणी प्रकार काजल मारुती काळे हिने तर जुगलबंदी प्रकारात सोनी, कमल
यांनी सादरीकरण केले. )

स्पर्धेत सहभागी परवीन रोशन शेख,दर्शना राजु वाघमारे, सोनाली दत्ला गाडेकर,नेहा पदामाकर जाधव,श्वेता संदिप आवचार,निकिता काशिनाथ खंडागळे,साक्षी भागवत कचरे,निकीता गणेश मिसाळ, तसलिम अमिन शेख,रेखा किशोर शिंदे.
महेंद्र भिमराव बनसोडे नृत्य दिगदर्शक,नितेश उध्दव जावळे ढोलकी वादक,रंजीत शहाजी लाखे तबला वादक,ढोलकी वादक भानुदास बापूराव घोसले, विक्की उध्दव जावळे पेटीवादक,प्राजक्ता प्रविण महामूनी,पोतदार पार्श्वगायीका,
पेटी वादक राजेंद्र मारोती उप्पलवार,गौतम माणिक आवाड दोलकी वादक, लक्ष्मण शामराव गंगावणे,पेटी वादक
यांना प्रमाणपत्र,शाल,श्रीफळ फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या तयारीसाठी मोडनिंब नटरंग कला केंद्राच्या नृत्य दिग्दर्षिका प्रमिला लोदगेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

कोट…. लावणीही महराष्ट्राची जगप्रसिद्ध पारंपरिक लोककला आहे.सध्याच्या काळात ती टीकावी रुजावी म्हणुन केलेल्या माझ्या प्रयत्नाला बावीस वर्षानंतर अकलूजच्या स्पर्धेतून यश मिळाले आहे.लावणी टीकावी म्हणुन माझा कायम प्रयत्न असेल. – निर्मला अनिता आष्टीकर ( कालिका सांस्कृतिक कला केंद्र चोराखळी .चालक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *