♦️तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचे पत्रकार आयुब शेख यांना यंदाचा राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील विविध विषयाला हाताळत, गरजू व पीडितांचा आधार बनून आपल्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडनारा पत्रकार आयुब शेख यांच्याकडे पाहिले जाते.
♦️सामाज प्रबोधन व परिवर्तनसाठीचे आपले अतुलनिय कार्य समाजाला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेवून जाईल याचा आम्हास विश्वास आहे. आपल्या या पत्रकारिता क्षेत्रातील अविरत सेवावृत्तीचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या वतीने आपणांस राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार व सन्मानपन्न देवून सन्मानित करीत आहोत असे जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी अयुब शेख यांना पुरस्कार प्रदान करताना म्हणाले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष
अॅड बाबासाहेब वडवे, अॅड. रामचंद्र ढवळे, मारुती बनसोडे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आपलं घर प्रकल्प आलियाबाद या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
♦️कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पन्नालाल भाऊ सुराणा होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सुरेश वाघमारे,डॉ. मिलिद वाकोडे पुणे (रो नि मुख्य कार्यकारी अधिकारी खादी कामोधो भारत सरकार) मा. अॅड. मैना (तृप्ती) भोसले / वडणे सदस्य, महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती धाराशिव. दत्तात्रय लांडगे उपजिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सदाशिव मा. प्रा. राजा सोनकांबळे एसएनडीटी महिला जुनिअर कॉलेज पुणे तसेच अनेक पुरस्कार मानकरी प्रतिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.