छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच सोयगाव तालुक्यातील अनेक आदिवासी समाजाचे गोरगरीब विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्यात आले आहे सोयगाव तालुका हा अती दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो हा पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे हा तालुका हा पूर्ण अजिंठा पर्वत डोंगर दऱ्यांनी व वन जंगलानी व्यापलेला भाग आहे सोयगाव तालुक्यातील अनेक असे गावं,तांडे, वाड्या.वस्त्या आदिवासी गावे आहेत ज्या ठिकाणी आज ही महामंडळ ची एस.टी.बस पोहचत नाही काही गावांना तर पाण्याची मोठी भीषण टंचाई आहे तर काही ठिकाणी लाईट ची समष्या तसेच अशा अनेक समश्यांना सामोरे जावे लागत आहे तरी सुद्धा शासन नेमक करत तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे जिल्हा परिषद च्या शाळा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट ला देऊन विलीन करण्याचा निर्णय घ्यायला शासनाला वेळ आहे मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आदिवासी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती चा निधी नेमका कुठं गायब आहे याचा शोध शासन प्रशासन घेणार का कि असेच या विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्यात येणार असा प्रश्न या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पडलेला आहे सोयगाव तालुक्यामध्ये अनेक आदिवासी गोरगरीब कुटुंब हे रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात काही कुटुंब ऊसतोड मजूर म्हणून बाहेर गावी काम करतात तर काही विटभट्टी चे काम करतात आदिवासी समाजाची खुप हलाख्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थिती मध्ये अनेक आदिवासी विद्यार्थी मधेच शिक्षण सोडून देत आहे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जो हक्काचा निधी त्यांना दिला जातो तोच निधी सध्याला नेमका कुणी गायब केलेला आहे हा महत्वाचा प्रश्न पूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे ट्रीबल इंजन सरकार असून ही या गोरगरीब आदिवासी समाजाची दुर्दशा होत असून कोणतीही दखल घेतली जात नाही हे मात्र आता दिसून येत आहे हा एक आदिवासी समजा वरती होणारा अन्यायच म्हणावा लागेल कारण आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचा शासनाला व प्रशासनाला विसर पडला कि जाणून बुजून हा खेळ त्यांच्या सोबत खेळला जात आहे हे कळायला मार्ग नाही सोयगाव तालुक्यामध्ये अगोदरच आदिवासी समाजाची हालक्याची बिकट परिस्थिती आणि त्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे सद्याच्या काळात बघितले तर आदिवासी समाज शिक्षणा पासून दुरावला जात आहे कारन शासन प्रशासन त्यांच्या साठी कोणत्याही उपाय योजना करत नाही सातत्त्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे तसेच मिळणारा शिष्यवृत्ती चा हक्काचा निधी तो ही वेळे वरती वाटप केला जात नाही त्यामुळे आदिवासी समाजाचे विद्यार्थी पालक यांना हा प्रश्न पडला गावामध्ये चौथी.. ते सातवी पर्यंत शाळा असतात मग बाहेर गावी शिक्षण कसे घ्यावे त्यात शासनाने दळण वळण ची सुविधा उपलब्ध नाही अशा अनेक समष्या निर्माण होतात त्यामुळे या आदिवासी समाजाच्या विध्यार्थ्यांना मधेच अपूर्ण शिक्षण घेऊन सुरु असलेले शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते त्यामुळे या गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडी अडचणी शासन कधी जाणून घेणार यांच्या साठी कधी व काय उपाय योजना शासन करणार शासनाचे व प्रशासनाचे आदिवासी समाजाच्या विकासाकडे नेहमी सातत्त्याने दुर्लक्ष होताना दिसून येत आहे खुप भयानक मोठी गंभीर परिस्थिती सध्याला आदिवासी समजा समोर निर्माण झालेली आहे

N TV न्युज मराठी प्रतिनिधी जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *