शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन,जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन
छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांच्या लेझीम, दांडपट्टा, तलवारबाजीने सर्वांचे लक्ष वेधले
AHILYANAGAR | छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी दि.१९ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासन, अहिल्यानगर महानगरपालिका व रेसीडेन्शियल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शहरातून जय शिवाजी, जय भारत पदयात्रा काढण्यात आली. यात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसिडेन्सी हायस्कूल चे सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली. व रेसिडेन्सी हायस्कूल येथे पदयात्रेची सांगता झाली.
केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यामंध्ये जय शिवाजी – जय भारत पदयात्रा काढण्यात आली. अहिल्यानगर येथेही आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हि पदयात्रा पार पडली, यावेळीजिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे सेक्रेटरी विश्वासराव आठरे,जयंत वाघ, डॉ विवेक भापकर, दीपलक्ष्मी म्हसे, बाळासाहेब सागडे, विजयकुमार पोकळे आदींसह शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेने पदयात्रेचे नियोजन करून उपाययोजना केल्या. पदयात्रेत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्यक्षिके नागरिकांची आकर्षण ठरली. रेसिडेन्शियल हायस्कूलचे व इतर शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. माळीवाडा बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे जय शिवाजी जय भारत पदयात्रे बाबत जनजागृती करण्यात आली त्यानंतर पदयात्रा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा वेस, आशा टॉकीज, कापड बाजार, तेलिखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजामार्गे दिल्लीगेट ते रेसिडेन्सिअल हायस्कूल दरम्यान यात्रेचा समारोप झाला.
दरम्यान, महानगरपालिकेच्या आवारातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त, संतोष टेंगळे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे,शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे उपअभियंता श्रीकांत निंबाळकर आदींसह सर्व विभागप्रमुख, प्रभाग अधिकारी, सर्व मनपा कर्मचारी उपस्थित होते. मनपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात शिवजयंती निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, नागरिक व युवकांच्या अंगी असलेले नेतृत्व गुण विकसित करणे, आधुनिक भारताला शिवाजी महाराजांचे सुशासन, व्यवस्थापन, सामाजिक समभाव, दुरदृष्टी व महाराजांच्या रयतेच्या राज्याची माहिती सर्व नागरिकांना व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.