व्हॉईस ऑफ मिडियाची मागणी
चामोर्शी :- मिडिया लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. विविध स्तरावरील छायाचित्र व बातम्या संकलन करून प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याचे काम पत्रकार करीत असतो. मात्र यात्रा किंवा विविध गर्दीच्या ठिकाणचे छायाचित्र व बातमीचा मथळा संकलन करताना बऱ्याच ठिकाणी पत्रकारांना अडविले जाऊन मज्जाव घातला जातो. त्यामुळे पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. यात्रा काळात पत्रकारांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी व्हॉईस ऑफ मिडिया तालुका चामोर्शी यांच्या वतीने सभेत घेण्यात आलेल्या विषयानुसार प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
२६ फेब्रुवारी २०२५ पासून महाशिवरात्री निमित्त यात्रेला सुरुवात होत असून, जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान, आष्टी परिसरातील चपराळा देवस्थान आदी ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. यात्रेचा संपूर्ण परिसर भक्तिमय राहत असून, यात्रेदरम्यान तारेवरची कसरत करणारे ड्रामासह विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. मंदिर परिसरात देवदर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागत असतात. मुख्यमंत्र्यापासून तर इतर पदाधिकारी व अधिकारी यांचेही मंदिरात पूजापाठ सुरू असतात. याबाबतची माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित करण्यासाठी मंदिरातील छायाचित्र व बातमीचा मथळा पत्रकारांसाठी महत्वाचे आहे. एवढेच नाही तर यात्रा दरम्यान चेंगराचेंगरी, चोऱ्या, दरोडे, सारखे अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याही बाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांवरील हल्ले सुध्दा टाळता येत नाहीत. मात्र अशावेळी पोलीस प्रशासन किंवा संबंधित विभागाचे अधिकारी यांचेकडून पत्रकारांची सुरक्षा होत नाही. पत्रकारांची अवहेलना होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसून आले आहेत. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षा पासची सुविधा करण्यात यावी अशी मागणी व्हॉईस ऑफ मिडिया तालुका चामोर्शी यांच्या वतीने

व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुड्डमवार, तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर , सचिव विनोद खोबे, उपाध्यक्षा धनराज वासेकर, पांडुरंग कांबळे, भास्कर फरकडे, मार्गदर्शक बबन वडेट्टीवार, कालिदास बनसोड, दीपक रॉय, अयाज शेख, हेमंत उपाध्ये, अशोक खंडारे, गणेश शिंगाडे, कार्याध्यक्ष कालिदास बुरांडे, कार्यवाह प्रकाश घोगरे, कोषाध्यक्ष अरुण गव्हारे, सहसचिव मारोती बारसागडे, प्रसिध्दी प्रमुख उमेश गझलपल्लीवार सदस्य दीलखुष बोदलकर, सुधीर फरकाडे, अमित साखरे, महादेव निकोडे व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भास्कर फरकडे रिपोर्टर एन टिव्ही न्युज मराठी गडचिरोली