मुंबई
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रायगड जिल्ह्यातील पत्रकार तथा दैनिक बेधडक महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक अभिजीत दरेकर यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात
अभिजीत दरेकर यांच्या सतत च्या परिश्रम व निर्भीड रोखठोक पत्रकारिता चा सन्मान म्हणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली रायगड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अधिक पत्रकारिता बळकट होईल असा विश्वास करून व यालाच अनुसरून त्यांचे काम कार्य बघून त्यांची ही निवड करण्यात
आली. व्हॉईस ऑफ मीडिया’चे अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या भव्य दिव्य सोहळ्यास प्रमुख पाहुणे: म्हणून हेमंत पाटिल (खासदार), अमृता फडणवीस (बँकर, गायिका व सामाजिक कार्यकर्त्या), बॉलिवूड चे सुप्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ,) मंगलप्रसाद लोढा (मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता), प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री), पंकज भोयर (राज्य मंत्री), पाशा पटेल (अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग), शायना एन.सी. (शिवसेना नेत्या, शिंदे गट), ब्रिजेश सिंह (महासंचालक, माहिती व जनसंपर्क), डॉ. शुभ विलास (लाईफस्टाईल कोच, कथाकार आणि लेखक) यासारखे अनेक नेते अभिनेते उपस्थित होते.या वेळी रायगड जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी उपस्थिती लावली. रघुनाथ कडू, किरण मोरे, रोहन कडू, सुधीर देशमुख, दीपक जगताप, कृष्णा सगणे, गणेश लोट, संकेत घेवारे, संदेश साळुंके, श्रेयस ठाकूर, महेंद्र आव्हाड यांसह अनेक पत्रकार व मान्यवरांनी अभिजीत दरेकर यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
N TV न्युज मराठी
रिपोर्टर जब्बार तडवी