चंद्रपुर
सिंदेवाही
सोमवार, दि. 24.02.2025 रोजी कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, ता. जि. चंद्रपूर येथे पी. एम. किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भागलपुर, बिहार येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. व्ही.जी. नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, मा.श्री संदीप पानमंद तहसिलदार सिंदेवाही, श्री, सी.एस .ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर, श्री, पी. जी. गव्हारे, उपविभागीय कृषि अधिकारी, नागभीड, कु. के एस ऑटी, तालुका कृषी अधिकारी, सिंदेवाही, उपस्थित होते. श्री संदीप पानमंद यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे योगदान खुप मोलाचे आहे, असे मत व्यक्त केले तसेच जस्तीत जास्त शेतकऱ्यानी अॅग्रीस्टक वर नोंदणी करन्याचे आव्हाण केले.

श्री, सी.एस .ठाकरे, यांनी केंद्र व राज्य शासनाकडुन राबविण्यात येणाऱ्या कृषि योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सुचविले, डॉ.जि.आर. श्यामकुवर यांनी उन्हाळी धान लागवड या विषयी माहिती दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. व्ही.जी. नागदेवते, यानी कृषी विद्यापीठानि विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञाना विषयी सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात जिल्हयातील शेतकरी व गटांच्या माध्यमातुन उत्पादित केलेले विविध शेती उत्पादने व प्रक्रियायुक्त पदार्थ यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदर प्रदर्शनाची पाहणी करुन मान्यवरांनी शेतकरी बांधव, शेतकरी व महिला गटांनी चांगल्या प्रकारे पिकविलेल्या व उत्पादीत केलेल्या शेतमालाची माहिती घेतली व शेतकऱ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमादरम्यान प्रगतीशील शेतकरी, श्री. माधवरावजी आदे, श्री. हेमंत शेंद्रे, श्री.वामन बोरकुटे, श्री.दिनेश शेंडे, सौ. वर्षा लांजेवार, सौ.छाया करकाटे, सौ.प्रज्ञा देवघरे आणि श्री.दिलीप उईके यांचा कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विजय सिडाम, डॉ. सोनाली लोखंडे, कु. स्नेहा वेलादी डॉ. वर्षा जगदाळे, श्री. सुशांत डबोले, श्री. निलकमल बारसागडे, चैतन्य धामणकर, श्री. कैलाश कामडी, श्री. संतोष पवार तसेच सिंदेवाही तालुक्यातील कृषि सहाय्यक व जिल्हयातील शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वी होणेसाठी कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
Ntv न्यूज़ मराठी
चंद्रपुर सिंदेवाही