६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनात सहभागी होणार
मुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे सहभागी होणार आहेत.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी डॉ. ओमप्रकाश शेटे यांना नुकतेच भेट घेऊन निमंत्रण दिले.
संघटनेचे निमंत्रण डॉ.शेटे यांनी स्वीकारले तसेच पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य विषयक प्रश्नांमध्ये योग्य ती मदत करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान आयुष्मान भारत मिशनच्या देशांत आणि महाराष्ट्रात चाललेल्या वाटचालीची त्यांनी दिली.राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्या अडचणी व संघटनेच्या आजवरच्या वाटचालीबद्दल डॉ. ओमप्रकाश शेटे यांना माहिती दिली.
