नालायक भ्रष्टाचारी आनंदात झोप घेत आहे घरात. मात्र आदिवासी कुटुंब मरणाच्या दारात
शासनाने लवकरात लवकर न्याय न दिल्यास आदिवासी कुटुंब करणार मुलाबाळान सहित आत्महत्त्या
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील टिटवी,पळसखेडा शिवार येथे साठवण तलावामध्ये सुरु असलेल्या शासनाने कोठ्यावधी रुपये खर्च करून साठवण तलाव उभारण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे मात्र या कामामध्ये शासकीय कर्मचारी अधिकारी आणि या स्थानिक च्या गावातील काही पुढारी,नेते व दलाल संगनमत करून मोठा भ्रष्टाचार करीत आहे या कामात आदिवासी व गोर गरीब शेतकरी यांच्या वरती काही कर्मचारी,अधिकारी, ठेकेदार तसेच काही दलाल हे हुकूमशाही पद्धतीने या साठवण तलावाचे खोदकाम करीत आहे आदिवासी समाजाचे शेतकरी व इतर शेतकरी यांच्या वरती शासनाचेच कर्मचारी,अधिकारी हुकूमशाही पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करून दादागिरी करून या शेतकऱ्यांच्या शेतात त्यांची कोणतीही संमती न घेता त्यांच्या शेताची मोजणी न करता त्यांना कोणताही जमिनीचा मोबदला न देता सर्रास पणे लघु पाठ बांधारे विभागाचे अभियंता, उप अभियंता व ठेकेदार त्यांची जमीन खोदून उद्धवस्त करीत आहे या आदिवासी गोर गरीब शेतकऱ्यांनी अनेक वेळेस न्याय हक्कासाठी वेळो वेळी सोयगाव तहसीलदार, सिल्लोड उप विभागीय अधिकारी, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी यांच्या कडे न्याय हक्कासाठी अर्ज सादर केलेले आहे मात्र शासनाने प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही आणि या आदिवासी शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय सुरु आहे या शेतकऱ्यांची कोणतीही संमती न घेता दादागिरी करून त्यांची शेती पूर्ण पणे यंत्रने मशनरी द्वारा उध्वस्त करण्याचा प्रकार सुरु आहे आणि हे शेतकरी त्यांना विनंती करून काम थांबविण्यासाठी गेले असता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्या वरती शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात अशी प्रतिक्रिया या आदिवासी पीडित कुटुंबाने दिली व सांगितले तसेच त्यांचे राहते घर हे गवती छप्पर ( सप्पर ) हे ही तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहे त्यांची जमीन ही गेली आणि राहते छत हे ही हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे त्यामुळे या आदिवासी कुटुंबाचे जगणे मुश्किल झाल्याचे या पीडितांनी सांगितले जर या आदिवासी शेतकऱ्यांना या जमीन चा मोबदला ना मिळाल्या आणि हे हुकूमशाही पद्धतीने सुरु असलेले खोदकाम न थांबविल्यास हा अन्याय अत्याचार न थांबविल्यास शासनाने याची दखल घेऊन न्याय न मिळाल्यास या अन्याया ला व त्रासाला कंटाळून हे आदिवासी कुटुंब त्यांच्या मुलाबाळानसहित आत्महत्त्या करून जीवन यात्रा संपवीनार असल्याचे या आदिवासी शेतकरी कुटुंबाने सांगितले या साठी शासनाने लवकरात लवकर आम्हाला या आमच्या जमीन चा मोबदला देण्यात यावा आणि हे कायद्याचे उल्लंघन करणारे भ्रष्टाचारा चा महा तांडव माजवीणारे दोषी कर्मचारी, अधिकारी, ठेकेदार. व दलाल यांच्या वरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी हे अन्याय ग्रस्त पीडित आदिवासी कुटुंब मागणी करीत आहे हा गंभीर प्रकार आणि
हुकूमशाही भ्रष्टाचाराचा महा तांडव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्याच जिल्ह्यामध्ये हा अन्याय आदिवासी कुटुंबावरती सुरु आहे पालक मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री महोदय या प्रकरणाची दाखल घेणार का आणि त्या भ्रष्टाचारी कर्मचारी,अधिकारी, अन्याय करणारे हुकूमशाही करणारे बेजबाबदार कायद्याचे उल्लंघन करणारे यांच्या वरती कारवाई करणार का आणि या गोरगरीब आदिवासी पीडित कुटुंबाला न्याय देणार का या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे हे आदिवासी पीडित कुटुंब शासनाकडून न्यायाची मागणी व अपेक्षा करीत आहे आणि शासनाने या प्रकरणी लवकरात लवकर दखल घेऊन न्याय न दिल्यास हे गोरगरीब पीडित आदिवासी कुटुंब या जाचकाला त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलाबाळान सहित संपूर्ण कुटुंब आत्महत्त्या करून जीवन यात्रा संपविणार असल्याचे मौजे टिटवी येथील रहिवासी शब्बीर जिलानी तडवी व इतर पीडित कुटुंबाने अशी माहिती तसेच प्रतिक्रिया देऊन हा पूर्ण प्रकार सांगितला

N TV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी