- पुण्यात तरुणाचे रस्त्यावरील अश्लील कृत्य प्रकरण
- गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी
- कराडमध्ये गौरव अहुजा झाला होता सरेंडर
- त्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते
- त्याच्या मित्राला देखील काल रात्री अटक करण्यात आले होते
गौरव अहुजाला एक दिवसाची पोलीस कोठाडी
- पुणे शहरातील येरवडा येथे मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मध्यभागी BMW कार उभी करून लघुशंका करून त्याने जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी काल ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. गौरव अहुजाला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना केवळ एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात या दोन्ही तरूणांच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला.
भाग्येश ओसवालच्या वकीलांचा युक्तीवाद
- भाग्येश ओसवाल याचे वकील पुष्कर दुर्गे यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली, पण माझा अशिल गाडीत बसला होता. ओसवाल गाडीतून खाली उतरला नाही, ओसवाल गाडी सुद्धा चालवत नव्हता. भाग्येश ओसवाल स्वतः पोलिसात हजर झाला आहे. भाग्येश ओसवाल याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? फक्त गाडीत शेजारी बसला म्हणून त्याच्यावर कलम लावला गेला. भाग्येश ओसवाल याचा जामीन अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं
गौरव अहुजाच्या वकिलांचा युक्तीवाद
- या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाच्या वकिल सुरेंद्र आपुणे यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, नोटीस द्यायची नाही, मिडिया आणि राजकीय दबावाखाली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या आहेत. सरळपणे सेक्शन ६५ लावलं गेलं. जो पर्यंत केमिकल रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत कलम ६५ लागू शकत नाही. पोलिसांनी असं कुठलंही द्रव्य जप्त केलं नाही. गाडी गुन्ह्यात वापरली नाही, जस्टीफिकेशन पोलिसांकडून दिसून येत नाही, आरोपी पळून गेलेला नाही, तो स्वतः कराड पोलिसांकडे हजर झाला आहे, असा युक्तीवाद गौरव आहुजा याच्या वकीलांनी केला.