( मनोहर तावरे )

   ग्रामीण पोलीस दलात सध्या अपुरी कर्मचारी संख्या लक्षात घेत शासनाने होमगार्ड भरती केलीय. तसेच माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध मिळाली. पोलीस प्रशासनात काम करताना आपणच पोलीस ‘च’ आहोत या रुबाबात हे तरुण वावरत आहेत. मात्र यांना कर्तव्याचा पुरता विसर पडला आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी. 

   राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलिसांसोबत प्रभावीपणे काम करणारे होमगार्ड हे अनेकांनी पाहिले आहेत. अनेकांचे कामही समाधानकारक असते. परंतु सध्या नवीन भरती झालेले काही तरुण ते स्वतःला पोलीस असल्याच्या रुबाबात वावरत आहेत. यादरम्यान त्यांना कर्तव्याचा उरतात विसर पडला आहे. बहुतांश होमगार्ड हे नागरिकांशी असभ्य व उद्धवर्धनूक करत असल्याचे समोर आले. 

   जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात अधिकृत कर्तव्यावर नसताना अनेक जण मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वर्दीचा गैरवापर करत आहेत. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यांवर गाड्या अडवणे कारवाईचा धाक दाखवणे बेकायदेशीर सरकारी वाहने चालक अशा ठिकाणी यांचा वावर वाढला आहे. 

       ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक होमगार्ड हे पोलीस असल्याचे समजून त्यांच्याशी सभ्यतेने वागतात परंतु याचा गैरफायदा घेऊन अनेक होमगार्ड कर्तव्यात कसूर करत आहेत. सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी कर्तव्यावर असताना मोबाईल फोन द्वारे टाईमपास करतात. याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी बारामती समादेशक श्री सोनवणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *