वाकी बु!! ता: महाड, जि: रायगड येथे सदर देवीचा पालखी उत्सव सोहळा शुक्रवार दि: १४/०३/२०२५
ते शनिवार दि: २२/०३/२०२५ पर्यंत साजरा करण्यात येणार
आहे. कोकणात शिमगाला खूप महत्त्व आहे, शिमगा उत्सवाला सुरुवात झाली असून पालखीच्या एक दिवस अगोदर होळी पेटवली जाते, भक्ती भावाने गावकरी एकत्र येऊन होळी आनंदात साजरा करतात, होळी झाली की दुसऱ्या दिवशी पालखी ला सुरुवात होते, बारा वाडीतील ग्रामदैवत नवसाला पावणारी श्री. आई सोमजाई, देवीचा पालखी उत्सव भक्तीभावाने, आनंदाने, एकजुटीने एकत्र साजरा करतात. ह्यात कोणताही भेदभाव नसतो. वाडीतील मुले आई सोमजाईची टी-शर्ट चा पेराव करतात, पालखी सोहळ्याला विविध कार्यक्रमाची रूपरेषा आयोजित करण्यात येते, पालखी मिरवणूक प्रत्येक वाढीत गावोगावी प्रस्थान होते, पालखी घरोघरी फिरते अशा प्रत्येक वाडीत पालखी आल्यावर अंगणात रांगोळी, दीप रोशेनी, पताके तोरण, फटाके लावतात, सजावट केली जाते, रुढीपरंपनुसार सभासद आपल्या इच्छेनुसार दर्शन घेऊन आईची ओटी भरतात. नवस फेडतात, मिरवणूक व वस्तीच्या दिवशी गजर, भजन, कीर्तन, जागरण असे विविध कार्यक्रम समस्त गावकरी आनंदाने साजरे करतात. पालखी उत्सव सोहळा कार्यक्रमाची मिरवणूक श्री देवी सोमजाई देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, ग्रामस्थ यांच्यापासून सुरुवात होते, पालखी उत्सवात अनेक मान्यवर व मुंबईचे चाकरमणी सहभागी होतात, तरी सर्व भक्तांनी पालखी उत्सव सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन, कृपाशीर्वाद तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री देवी सोमजाई देवस्थानचे अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त, समस्त ग्रामस्थांनी केली आहे.

श्री. देवी सोमजाई ही स्वयंभू व पुरातन जागृत देवस्थान आहे, देवीचा महिमा आपल्या सर्व भक्तांना ज्ञात आहे. ह्या मुर्ती पाषाण काळातील असून ह्यात आई सोमजाई, भैरी, जोगेश्वरी, जननी, पांगारकरीण, काळकाई, नामदाईकरीण अशी ईतिहास काळातील प्राचीन मुर्ती आहेत
तरी आपण आपल्या सर्व कुटुंब व मित्र परिवार सह ह्या सोहळा मध्ये सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. दैनंदिक कार्यक्रमाचे निमंत्रण रूपरेषा खालील प्रमाणे दिली आहे.

शुक्रवार दिनांक १४/०३/ २०२५ दुपारी तीन ते चार वाजता पालखी सजावट गादीवर नंतर पालखी सोमजाई मंदिराला भेट व प्रदक्षिणा, त्यानंतर शेवते गावाकडे प्रस्थान रात्री गावठाण येथे वस्ती. शनिवार दि: १५/०३/२०२५ पालखी मिरवणूक गावठाण रात्री नानेमाची येथे वस्ती ह्याच प्रमाणे दर दिवशी प्रत्येक गावात (वाडीत) पालखी मिरवणूक व वस्तीला असते. नानेमाची, नानेमाची आवाड, शेवते, आंब्याचा माळ, खडकवाडी, रोहिदास वाडी, शेंदूरमळई, नारायण वाडी, नाद्रुक वाडी, पेडमकरवाडी, शिवाजीनगर अशा प्रत्येक गावोगावी पालखी मिरवणूक फिरते व वस्तीला असते. रस्त्यामध्ये येणाऱ्या भाविकांना दर्शन, पूजा अर्चनाचा, प्रसादाचा लाभ दिला जातो. शेवटी शनिवार दि: २२/०३/२५ दिवशी सकाळी ८:०० ते १० वा. देवीच्या गादीवर पालखी विसर्जन करून सोहळा संपन्न केली जाते. या पालखीला सर्व विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित राहतात. माननीय श्री. संजय गंगाराम कदम (अध्यक्ष ) श्री. प्रकाश चंद्र दरेकर (उपाध्यक्ष) श्री. श्रीरंग भागोजी भोसले (सचिव) श्री. अमोल भाऊ जाधव (खजिनदार) विश्वस्त श्री. मोहन म्हामुणकर, श्री. प्रदीप म्हामुणकर, श्री. प्रभाकर कदम, श्री. दीपक कदम, श्री. गणपत सालेकर, श्री. सदाशिव मोरे, श्री. रोहिदास जाधव, श्री. बबन मोरे, श्री. सुरेश म्हामुणकर व समस्त ग्रामस्थ मंडळी ह्यांचे सहकार्य लाभते. आई सोमजाई देवीचा उदो उदो असा जल्लोष केला जातो.