चंद्रकांत साळुंखे ह्यांची पडवी पठार मुंबई मंडळाच्या अध्यक्षपदी निवड
सन्माननीय चंद्रकांत दादा साळुंखे ह्यांची हनुमान विकास मंडळ पडवी पठार मुंबई मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. आपल्याला समाज सेवेचा असलेला दांडगा अनुभव तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना पद्मश्री डॉ.लहाने साहेब यांच्या सोबत रुग्णांची प्रशासकीय सेवा केली होती. डाॅ.लहाने सर यांनी एक लाख रूग्णांना ऑपरेशन करून दिलेली दृष्टी हे सर्व बघून आपल्याला समाज सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. आपण करीत असलेल्या या समाज सेवेच्या कार्यामुळेच आपल्याला गावातील अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष पदी निवड झाल्यावर ऊद्योजक व थोर समाजसेवक चंद्रकांत कदम शेठ ह्यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या गावातील तरुण वर्गाला योग्य दिशा देण्याचं काम करायच आहे असा विश्वास त्यांनी दिला. अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी मी पदमश्री डाॅ. तात्याराव लहाने सर या देव माणसाच्या सानिध्यात राहील्यामूळे समाज सेवेची आवड निर्माण झाल्याचे अभिमान आहे असे साळुंखे यांनी सांगितले.