केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देत अमित शाहांचे स्वागत केले. अमित शाहांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यादरम्यान सह्याद्री अतिथीगृहात ही सदिच्छा भेट झाली.
