मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी खेड तालुक्यातील वडगावचे सुपुत्र प्रकाशराव गणपतराव चव्हाण यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांनी ही घोषणा केली.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष अभिजित दरेकर आणि राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके यांच्या सूचनेनुसार प्रकाशराव चव्हाण यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मराठा क्रांती स्वराज्य संघटना ही अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरुद्ध काम करणारी संघटना असून, छत्रपती शिवरायांच्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या संकल्पनेवर तिचा पाया आधारित असल्याचे प्रकाशराव चव्हाण यांनी सांगितले. समाजहित, न्याय आणि हक्कांच्या रक्षणासाठी संघटना कार्यरत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या कणखर नेतृत्वामुळे संघटना अन्यायाविरुद्ध लढणारे हक्काचे व्यासपीठ बनली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे, राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र पाटील, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. सौ. संध्याताई राणे, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड, वैद्यकीय राज्य अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, संघटक गणेश चौधरी, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी, प्रदेश सचिव निवृत्त पोलीस निरीक्षक आनंदराव जाधव यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे, सहसचिव अजय पडवळ, कल्याण-डोंबिवली प्रवक्ते गणेशराजे मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष विलास चाळके, संपर्क प्रमुख समीर महाडिक, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. अस्मिता आत्माराम साळुंखे, खालापूर तालुका अध्यक्ष दिनेश रमेश महाडीक, तालुका सल्लागार ॲड. सचिन चाळके आणि रोहा तालुका अध्यक्ष समीर मोरे यांच्यासह शेकडो समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरातील सामाजिक कार्याचा आलेख पाहता प्रकाशराव चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावरून पदोन्नती देऊन राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *