गंगापूर, प्रतिनिधी अमोल पारखे दि. २२ मार्च रोजी : गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील कु. प्रतीक्षा अण्णासाहेब भडके हिची भारतीय नौदलात AVR-SSR पदावर निवड झाली असून तिच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
हा समारंभ शनिवार, दि. २२ मार्च रोजी हॉटेल अजिंठा, वैजापूर रोड, गंगापूर येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला.
या वेळी रे. फा. संजय रुपेकर (सचिव, सेंट फ्रान्सिस डि-सेल्स शिक्षण संस्था), भागवत गिरी (शाखा प्रमुख, गरुड झेप अकॅडमी), अमृत काळे (क्रीडाप्रमुख, गरुड झेप अकॅडमी), संजय बनसोडे (प्राचार्य, सेंट मेरी विद्यालय), बद्रिनाथ मनाळ (उपप्राचार्य, सेंट मेरी विद्यालय), प्रदीप पाटील (मा. नगरसेवक, गंगापूर), संतोष गायकवाड (मा. नगरसेवक, नाशिक), सुदाम भडके (सरपंच, वाहेगाव), डॉ. पांडूरंग मगर, दीपक साळवे, सुनील बोराटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांनी कु. प्रतीक्षाचे कौतुक करताना तिने मिळवलेले यश हे संपूर्ण गावासाठी आणि नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तिच्या आई-वडिलांनीही आपल्या भावना व्यक्त करताना तिच्या मेहनतीबद्दल आणि जिद्दीबद्दल अभिमान व्यक्त केला. समारंभाच्या अखेरीस कु. प्रतीक्षा हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना, मार्गदर्शकांना आणि गुरूजनांना दिले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कु. प्रतिक्षावर शुभेच्छांचा वर्षाव केला…