येरमाळा प्रतिनिधी – (सुधीर लोमटे ) –
येरमाळा येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेमध्ये १ ली च्या सर्व विद्यार्थीनींना शाळेमध्ये जेवणासाठी स्टीलच्या ताटाचे वाटप करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रविण बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मोत्सव समिती कडून विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये कांही विद्यार्थीनींना प्रोत्साहनपर रोख स्वरूपात बक्षिसे मिळाली होती . त्याचा उपयोग सर्वच विद्यार्थ्यांना व्हावा या हेतुने वर्गशिक्षिका श्रीमती दिडवळ ( पेजगुडे ) मॅडम यांच्या संकल्पनेतून व स्वनिधीतून इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थीनींना शालेय पोषण आहार घेण्यासाठी स्टील च्या ताटाचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी कळंब गट शिक्षणाधिकारी काळमाते, विस्तार अधिकारी माळी, येरमाळा केंद्रप्रमुख अनिल बारकुल, मुख्याध्यापक ठोंबरे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहू बारकुल, शिक्षीका वनवे मॅडम, उकिरडे मॅडम, चेचे मॅडम व पालक माता – पिता उपस्थित होते . या स्तुत्य उपक्रमाचे शिक्षणप्रेमी, पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे .