या घटनेत दोन महिला जागीच जखमी
कलमेश्वर पोलीस पुढ़िल तपास करित आहे
(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)
नागपूर जिल्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राऊळगाव शिवारात येत असलेल्या एनविरा
गावाजवळ असलेल्या एसबीएल
एनर्जी लिमिटेड या बारूद
कारखान्यात आज शनिवार दि.
26 एप्रिल रोजी दुपारी 12:30
वाजताच्या सुमारास अचानक
स्फोट झाल्या. या स्फोटात दोन
महिला कामगार चक्क किरकोळ
जखमी झाल्या.सूत्राचामाहिती नुसार सदर कंपनीमध्ये खाणकाम
औद्योगिक स्फोटकांचे उत्पादन
करण्यात येते. स्लरी स्फोटके
पुरवठादार म्हणूनही त्या
कंपनीची ओळख आहे. खाण
आणि बांधकाम उद्योगांमध्ये या
स्फोटकांचा वापर केल्या जातो.
आज शनिवारी दुपारी 12:30
वाजताच्या दरम्यान लॅबमध्ये
एक्स्प्लोजीव टेस्टिंग करत
असताना अचानक स्फोट होऊन
महिला कामगार वंदना जंगेला व
अर्चना लोखंडे दोघीही रा. काटोल
व यांचा हात जळाला. त्यांना
उपचारार्थ कळमेश्वर येथील
खासगी रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. दैव
बलवत्तर म्हणून कुठलीही
अनुचित घटना या ठिकाणी
घडलेली नाही. जखमी महिला
कामगारांवरउपचार करून त्यांना
सुटी देण्यात आली आहे.
दरम्यान घटनेची माहिती
मिळताच कळमेश्वर पोलीस
स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज
काळबांडे यांनी घटनास्थळाला
भेट देऊन जखमींची विचारपूस
केली. पोलिसांनी घटनेची नोंद
घेतली असून पुढील तपास सुरू
आहे. या स्फोटामागचे कारण
नेमकं काय? यासंदर्भात पोलीस चौकशी करित आहे.