इतर वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कोमातच….
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कळवण मध्ये येताच कळवण मधील रस्त्यांना मलपट्टी तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक रस्त्यांची कामे चालू आहेत परंतु मात्र एकदम कासव गतीने ही कामे चालू असल्याची खंत यावेळी वाहनदारकांनी व्यक्त केली तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या शाळेचे उद्घाटन केले त्याच शाळेसमोरील रस्त्याचे काम हे गेल्या सहा महिन्यांपासून चालू आहे येथील रस्ता हा डांगसौदाणे सटाणा कडे जाणार रस्ता असून येथे नेहमी मोठी भीड होते मात्र त्याच रस्त्यावरून येथील शाळकरी मुलं देखील ये जा करीत असताना इकडे जाणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे तर मंत्री आल्यावर रस्त्यांना लगेच मलपट्टी केली जाते मात्र सर्व सामन्यांना कितीही रस्ता खराब झाला तरी तो सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि लोकप्रतिनिधींना दिसत नसावा का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे मंत्री तासभर येतात त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला जातो इकडे मात्र सर्व सामान्य जनता रोज जीव मुठीत धरून प्रवास करतात याकडे मात्र संबंधित प्रशासन कांनाडोळा करते

कळवण तालुक्यातील रस्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधीही दिला रस्तेही होतात मात्र चार सहा महिने झाल्यावर रस्त्यांची अवस्था ही पाण्यात खड्डा की खड्यात पाणी हेच समजत नाही मग नेमके चांगल्या दर्जाचे रस्ते बनण्यासाठी नेमका निधी कमी पडतो की काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतो आहे
त्यात डझनभर ठेकेदार झाल्यामुळे आणि टक्केवारीच्या नादामुळे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर बोलण्यास तयार नाही जर असच चालू राहिले तर निष्पाप जनतेला मात्र हे भोगावच लागणार की काय? ठेकेदार कोणताही असो तालुक्यातील कुठलेही रस्ते असो कॉलिटी मात्र सक्षम फेल आणि याला कारणीभूत मात्र फक्त टक्केवारी तालुक्यात रस्त्यांच्या निधीचा मात्र मोठा बोलबाला रस्त्यांची अवस्था आजही बघितली तर मृत्यूची सापळेच बनली आहेत.
प्रतिनिधी अनिल पवार कळवण नाशिक