गडचिरोली

कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या गेट क्र ४ पुढे कॅम्परने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना दि २ जून ला सायंकाळी ७: ०० वाजताच्या सुमारास घडली.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी कोनसरी येथील कॅम्पर क्र एम एच ३३ टी ४३४० चे वाहन चालक आकाश विनायक घोगरे वय २५ रा. चांदेश्वर ता. चामोर्शी याने आपल्या ताब्यातील वाहण हयगयीने चालवून चामोर्शी कडून कोनसरी येथे येत असलेल्या दुचाकी क्र एम एच ३३ ए एच ७४५२ ला जब्बर धडक दिली त्यामध्ये दुचाकीस्वार प्रणय गुरुदास आत्राम वय २५ रा. कोनसरी याचा जागीच मृत्यू झाला तर राहुल सुखदेव मडावी वय २८ रा कोनसरी हा जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे कॅम्पर वाहन चालक आकाश विनायक घोगरे यास ताब्यात घेऊन त्यावर कलम १०६ (१), २८१, १२५ (अ) B.N.S. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मदन म्हस्के हे करीत आहेत.

भास्कर फरकडे

प्रतिनिधी एन टिव्ही न्युज मराठी – गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *