
प्रतिनिधी (नळदुर्ग )
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील मध्ये बकरी ईद.राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्यावतीने दिनांक.4/6/25 आयोजित शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये करण्यात आलं आहे. पोलिसांच्या वतीने काही नियम सांगण्यात आले.
- कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा इदगाह मध्ये नमाज पठण करावं.
- जनावरांचे बाजार बंद असल्याने नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईलच्या माध्यमातून कॉल करुन जनावरे खरेदी करावीत.
- नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
- सध्या लागू असलेल्या निर्बंधामध्ये बकरी ईद निमित्ताने कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.
- नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. अनुपालन करावे. असे आव्हान नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी केले

यावेळेस उपस्थित माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी माजी नगराध्यक्ष शहबाज काझी माजी नगरसेवक विनायक अहंकारी ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे शहर काजी शोहेब काजी धर्मगुरू मैनोद्दिन हाफिस धर्मगुरू मोहम्मद रजा साहब. धर्मगुरू नियामत इनामदार धर्मगुरू फारुख हाफिस तलाठी कुलकर्णी मॅडम पशुवैद्यकीय अधिकारी
डॉ. आर. एस. धायगुडे-खाडे मॅडम
समाजसेविका सय्यद मॅडम अमीर शेख कय्युम सुंबेकर मुजम्मिल कुरेशी व नगरपालिकेचे कर्मचारी महावितरणचे अधिकारी परिसरातील पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठ नागरिक उपस्थित होते..
अय्युब शेख (नळदुर्ग)